STORYMIRROR

Jyoti gosavi

Tragedy

3  

Jyoti gosavi

Tragedy

ज्यांनी दिल्या होत्या यातना

ज्यांनी दिल्या होत्या यातना

1 min
457

कधी काळी होती ती

एक सुंदर ललना

मुसमुसलेल्या तारूण्याची

एक नवं यौवना


सोनचाफ्याची कांती तिची

गाल गुलाबी गुलाबी

मदहोश डोळे तिचे

जणू शराबी शराबी


सुंदर स्त्री ती झाली

एवढाच तिचा गुन्हा

कधीकाळी होती ती

एक सुंदर ललना


दोन नराधमांनी केली

तिची विटंबना

इच्छा-आकांक्षांना दिलि मुठ माती

संतापाने आणि शरमेने


तिने संपविले जीवना

मेली तरी ती अतृप्त होती

नव्हते चैन तिच्या मना

धरीला आकार देहाचा


पिसाटून आली या वना

बदला घेण्यासाठी तिने

जागविली अंतरीची चेतना

परतफेड केली त्यांची

ज्यांनी दिल्या होत्या यातना



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy