काय उरले?
काय उरले?
काय उरले...?
विस्कटले जीवन सारे
काय उरले बाकी
नियतीने सारे उधळले
आले नऊ नाकी
होते नव्हते ते सारे
वादळा सरशी वाहून गेले
जुन्या आठवणीचे कपटे उरले
अन मागे रिकाम्या खाटी
या खाटीवरी नवजीवन
पुन्हा अंकुरणार आहे
मातही पुन्हा मानव जिद्दीचा
नव्या जोमाने वादळास देणार आहे
दिसली जरी हार आमची
आता आम्ही मागे हटणार नाही
बदला वादळाचा या घेतल्याविन
आम्ही आता राहणार नाही
पुन्हा सजतील आठवणी
पुन्हा सजतील खाटा
आहेत जीवनी पुन्हा
नव्या फुटत्या सुंदर वाटा....!
