अखेरीस सूखावले व्रूध्दाश्रम
अखेरीस सूखावले व्रूध्दाश्रम
उभारली होती वास्तू उतार वयासाठी
थकलेल्या पावलांना थोडी विश्रांती मिळण्यासाठी
परंतु तिथे जमले बरेच असेही काही जण
ज्यांना स्वत:च्याच घरी जाणवत होते एकटेपण
वाढत्या वयानुसार हालचाल मंदावते
मन दमले नसले तरी शरीर मात्र थकते
आताच्या पिढीचा तंत्रद्न्यानाने वाढलाय जगण्याचा वेग
पण नकळत दोन पिढींमधल्या संवादांमध्ये आखली गेलीये रेघ
असे बरेच समवयस्कर जमले करण्यास विचारांची देवाण घेवाण
वृध्दाश्रमात होणाऱ्या ह्या टप्प्यातील मैत्रीला पाहून मिळते वेगळेच समाधान
तरीही घराची ओढ देखील सगळ्यांच्या चेहर्यावर दिसत होती
कधी कधी भेटायला येणारी त्यांची मुले आता कायमचे त्यांना घरी घेऊन गेली होती
जरी त्या रंगलेल्या गप्पांची उणीव बंद खोलीला आता जाणवते
तरी पुन्हा एकत्र आलेल्या घरट्यांना पाहून ती वास्तू देखील सुखावते
