आनंदयात्री
आनंदयात्री
प्रवासात आयुष्याच्या किती चढण उतरण
कधी ओघळती अश्रू कधी हर्षाचेही क्षण
कधी सुखावला गारवा कधी चटके सोसले
सुख असो व दुःख ते फार काळ ना टिकले
शाश्वत सत्य हे मग तो जन्म असो वा मृत्यू
शोध जगण्याचे मर्म अंतरी स्वतःच्या तू
ज्याचा जसा भाव त्याचा तसा अनुभव
गाईल गीत आयुष्य फक्त सूर तू जुळव
ओढ मनी लावून जाईल सहप्रवासी उतरून
ठेव सुरु अखंड प्रवास आनंदयात्री तू बनून
उत्सवासाठी करा उद्याची प्रतीक्षा कशाला
त्यासाठी जिंकण्याचा अट्टाहास तरी कशाला
साजरी करूया ना मग आत्ताची ही घडी
स्वप्नांसाठी घेतलेली प्रयत्नांची प्रत्येक उडी
जितके साजरे कराल तुम्ही तुमचे जगणे
आयुष्यही देत जाईल तितके तुम्हास बहाणे