अभ्यास घडवी करीअर
अभ्यास घडवी करीअर
कधी समजेल मला की उद्या मी नक्की कोण होणार
ताईसारखा डॉक्टर की दादासारखा इंजिनिअर होणार
कधी वाटते पायलट बनून उंच आकाशी उडावे
नाहीतर सैनिक बनून आपल्या देशासाठी लढावे
अभिनेता बनलो तर किती बरं धमाल येईल
जेव्हा ज्या पाहिजे त्या भूमिकेत जगता येईल
कि एखाद्या खेळातच खूप नाव कमवायचे
ठरतच नाहीये माझे नक्की काय मला बनायचे
बाबा म्हणतात उत्तम जीवनास अर्थार्जन महत्त्वाचे
ज्यासाठी योग्य करीअरची निवड करणे ही गरजेचे
आई देखील सतत मला अभ्यासाला बसवते
अभ्यासच दाखवेल योग्य दिशा असे तीही बजावते
एकूणच काय तर, करीअर निवडले जरी कोणतेही
सर्व विषयांचा अभ्यास करण्या वाचून पर्यायच नाही