STORYMIRROR

Sayli Kamble

Romance

3  

Sayli Kamble

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
140

अचानक नकळतच 

हे सारं घडत जातं

प्रेमात पडलोय आपण

हे हळूच उलगडत जातं

त्या व्यक्तीच्या सहवासात 

सतत रहावसं वाटतं

तिच्या प्रत्येक आठवणीनं

मन रोमांचित होतं

फक्त तिच्यातच असं

काय वेगळेपण असतं

तिच्या खेरीज काहीच 

सुंदर भासतं नसतं

तिचं सोबत असणं हे

इतकचं हवं असतं 

स्वप्नवतच सारं तेव्हा

जग भासू लागतं

तिचं हसणं, रूसणं 

मनाला वेड लावतं

तिच नसणं मात्र 

श्वास हिरावून नेतं

प्रेम व्यक्त करणं सर्वांना

जमेलच असं नसतं

कोणाचं ओठांवर येतं तर

कोणाचं डोळ्यांत साठून राहतं

मनाच्या एका कप्प्यात 

जपून ठेवलेलं असतं

पहिलं प्रेम हे नक्कीच 

खूपच खास असतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance