भ्याड आतंक
भ्याड आतंक
भ्याड आतंक
देशरक्षणार्थ जवान लढती
तमा न कसली बाळगता
अहोरात कार्यतत्पर देशसेवेस
कुटुंबापासुन दूर असता
दहशतीचा खात्मा करण्यास सज्ज
समयसुचक एक एक क्षण लढवय्या
उन्हा पावसाची पर्वा नाही
गारठाही सहन करती
दहशतवाद्यांना पळवाया
पुलावामातला भ्याड हल्ला
आतंकी अमानुष पाशवी
शुर सैनिक भारतभूचे
वीर ३९ झाले शहीद
धक्का हा मोठा मनामनात
वीरमरण येऊन वीरपुत्र कर्तव्यनिष्ठ
अनंतात झाले क्षणात विलीन
मनापासुन मानवंदना व भावपुर्ण श्रध्दांजली
त्या एक एक शूर वीर नौजवानास
