नाती सदाबहार काव्यांजली
नाती सदाबहार काव्यांजली
नाती
दुभंगली कुटुंब
हेकेखोर हो वागण्याने
दुरावली मने
प्रेमातली
सततचे वाद
मान सन्मानही नाही
काडी मोड होई
उभयतांचे
दोघांनी मताचा
करावा हो सन्मान
प्रेमळ मन
जपावेच
तिरस्कार करता
होईल हो ताटातूट
बंधन अतूट
तुटेल
घराला तडा
जाईल हो जीवनी
गोष्ट ध्यानी
धरावीच
दुभंगली नाती
नाही कुटुंब राहिले
घटस्फोट झाले
पतीपत्नीचे
टोकाची भूमिका
घेऊ नये कधी
विचार आधी
करावा
मुलांचे भविष्य
आहे आपल्याच हाती
जपुया नाती
आनंदाने
