शिल्पकार मी च माझ्या कर्माचा
शिल्पकार मी च माझ्या कर्माचा
शिल्पकार मी च माझ्या कर्माचा
नैराश्याची गडद छाया,
भोवताली पसरली माझ्या!
कर्माचे,ओझे बांधुनी नेती,
आत्म्यांस, जखडुनी माझ्या!! 1
जीवनाची, लालसा अजुनी,
बाकी,ह्रदयांत माझ्या!
नको म्हणते, तरी ओढते,
ती परी,आत्म्यांस माझ्या!! 2
वाटेकरी , सारेच इथले,
फक्त,सुखाचेच जगती!
एकटाच, माणुस येतो जन्माला,
अन, एकटेच, जग सोडुनी जाती!! 3
देह मानवाचा, हा दैवाने,
मिळाला ,होता मजला!
व्यसनापरि, बरबाद झालो,
घात,आयुष्याचा झाला!! 4
कशाला, नेतेस,आत्म्यांस माझ्या,
एकटा, सडायला मजला!
बघ, आकाशी काळे मेघ, दाटले,
उशीर नाही, आता सुगीला!! 5
दुष्काळाने, हिरावले माझे सुख,
गेलो, व्यसनांच्या आहारी !
उशीर झाला, हाती काही न उरले,
भोगतो,जीवनाची लाचारी !! 6
मोह जागला, माझ्या मनी,
होतो,पश्चाताप कृत्यांचा !
संयम,धैर्य,मनावरी,जर ठेवला असता,
शिल्पकार, मी च माझ्या कर्मांचा!! 7
