विस्कटले घर
विस्कटले घर
विस्कटले घर
फुलासम नात्याला
लागली हो नजर,
तुटला रे संसार
विस्कटले ते घर ॥१॥
उरल्या आठवणी
त्या ही परप्रांतीय,
नाही राहिले आता
मृत्युचेही आता भय ॥२॥
सुखाच्या प्रपंचात
कालवले ते मीठ,
चपात्या भाजायला
उरले नाही हो पीठ ॥३॥
फाटलेला कागद
धुळीने माखलेला,
खिडक्यांचा कोना
काळोखात झाकला ॥४॥
दोघांच्या असण्याने
घरपण आहे घराला,
नाहीतर चार भिंतीत
अर्थ काय जगण्याला? ॥५॥
