STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

अचानक..

अचानक..

1 min
252

विचार ही नाही केला होता की असा ही दिवस येईल 

न पाहिलेल्या ठिकाणी असे अचानक जाणें होईल 

जडला एक साधा आजार ऑपरेशन करणे होता उपाय 

ठरलेल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये शिरले 

नावनोंदणी करून हॉस्पिटलच्या कपडयात अवतरले 

नर्सताई आल्या सोबत सुया इंजेक्शन घेऊन आल्या 

पटकन मला झोपवले हातात इंजेक्शन टोचून सलायनला अडकवले 

त्यावेळी खरेच आजारी वाटू लागले 

माझा नंबर येईपर्यंत होता उशीर 

मन ही माझे होत होते बधीर 

मनाला वाटत होती भीती 

देवाचे नाव होते ओठी 

एकदाचा माझा नंबर आला 

ऑपेरेशन थिएटरचा दरवाजा उघडला मोठी मोठी उपकरण पाहून आणि भीती जाणवली 

पण टचकन इंजेक्शन मारून मला निद्रा अस्ता आली 

थोड्या तासाने डोळे उघडले 

आजूबाजूला माझी माणसं मला पाहत होते 

शुद्धीवर आली असे म्हणत होती 

मला माझे नवल वाटले जाताना सगळे पाहिले येताना मात्र डोळे बंद होते 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy