स्टोरी मिरर चे स्वप्न
स्टोरी मिरर चे स्वप्न


स्टोरी मिरर चे माझ्या स्वप्नात येणे झाले ...
हक्काने स्टोरी मिरर ने मला विचारले..
विसरलीस काय हल्ली तु मला ..
नाही लिखाण पोहचले तुझे मला ..
मी ही सांगितले न पाठवण्याचे गुपीत .
होते मी व्यस्त कामात ...
नाही काढु शकले वेळ ...
म्हणून नाही बसला आपला मेळ ...
हक्काने तु विचारले मनाला बरं वाटलं ...
पण तुला मी बरं कसं विसरेन..
तुझ्याच साथीने पहिले ऑनलाईन लिखाण सुरू केलें
तुझ्याच शाबासकी ने ते नावारूपास आले...
लिटररी कर्नल पदवी देऊन
ऑर्थर ऑफ द वीक तुन ऑर्थर ऑफ द इयर पर्यंत नेऊन पोचवले
तुझ्या सारखा लेखणीचा आधार स्तंभ
असताना माझे लिखाण कसे बरं थांबेल