एक ह्रदय
एक ह्रदय


एक हृदय अनेक स्वप्न घेऊन जगत
कधी हसत तर कधी रडत
कधी आनंदाने तर कधी आतुन तुटत
एक हृदय अनेक स्वप्न घेऊन जगत
कधी भयभीत होऊन धडधडत
तर कधी प्रेमाची कबुली देत
आठवणींचा कप्पा साठवत
तर कधी कोणाबद्दल सल बाळगत
एक हृदय अनेक स्वप्न घेऊन जगत
कधी कधी ह्दय आजारी पडत
बायपास पेसमेकर सारख्या बुडत्याला काठीचा आधार घेत जगत
पण जगण्याची आशा न सोडता लढत
एक हृदय अनेक स्वप्न घेऊन जगत
अनेक स्वप्न बाळगत ती पुर्ण होण्यासाठी धडपडत
एक हृदय अनेक स्वप्न घेऊन जगत
निसर्गाच्या नियमानुसार ह्दय थांबले तर ती स्वप्न ही थांबतील
तरी ही जीवनाची स्वप्ने रंगवत
एक हृदय अनेक स्वप्न घेऊन जगत