पाऊस आणि भजी
पाऊस आणि भजी


पाऊस आणि भज्याचा आहे अजब मेळ
पाऊसा शिवाय गरमागरम भज्याचा नाही रंगत खेळ
भजी आणि पाऊस म्हणजे सुयोग्य अशी वेळ
कांदा आणि मिरची जशी मिसळली जाते बेसन पीठात
पांढऱ्याशुभ्र आकाश गडत जात काळया ढगात
कांदा मिरची आणि बेसनाचे होते रंगबेरंगी मिश्रण
तसेच आकाशात होते ढगाळलेले वातावरण
कढईतले तेल गरम झाल्यावर येतो जसा आवाज
विजेचा ही आकाशात कडकडाट
जशे बेसनाचे मिश्रण सोडले जाते तेलात
तसेच पाऊस ही जोरात पडतो गारव्याला घेऊन साथ
एकीकडे पावसामुळे दरवळतो मातीचा सुगंध
तर दुसरीकडे गरमगरम भज्याचा घमघमाट पोहचतो शेजाऱ्यापर्यत