गुन्हेगार
गुन्हेगार


आपल्या कायदयाची रचना गुन्हा केला
कि कारागृहाचा रस्ता
कोर्ट कचेरीच्या फेऱ्या
त्यातून कधी सुटका तर कधी अजन्माची सजा
कधी फाशीचा फटका
हा आहे गुन्हेगारीला भयाचा वचका
पण ह्या गुन्हेगाराला कोण करेल जेरबंद
ज्याने मारला आहे जगभरात उच्छेद
कित्येक ढेर पाडत आहे मुत्यूचे दिवसा
कोणीच नाही पहिला त्याला
लोकांच्या आरोग्यशी खेळतो
चोरून त्याचा जीव नेतो
त्याचा भयाने जगणे सुरु आहे आमचे
आपल्या घराचा पत्ता त्याला न मिळो हाच पर्यंत आहे
कोण त्याला पकडेल व घालेल बेड्या
कोणतं न्यायालय देईल त्याला
कायमची फाशीची शिक्षा