ती ...आणि पाऊस
ती ...आणि पाऊस
ती खिडकी जवळ उभी होती...
बाहेर एकटक पाहात होती ...
न जाणे आज का तिच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव उमटलेले....
त्यात बाहेर वातावरण ही ढगाळलेले....
सोसाट्याच्या वाऱ्या ने पडझड चालु होती वृक्षांची...
तिच्या चेहऱ्यावर दिसत होते तिच्या मनात चालू होती अनेक रांगा प्रश्नांची....
कदाचित तिचा कंठ दाटून आला होता ...
आकाश ही काळया ढगात गडुन गेला होता ...
हुंदकयाचा आवाज ऐकू आला....
आकाशात वीजेच्या प्रकाशाने दणाणून परीसर गेला ..
अचानक काय झाले समजले नाही
तिच्या डोळ्यांतून वाहू लागली अश्रुंची फुले...
बाहेर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसल्या इथे तिथे...
एकीकडे दडलेल्या दुःखाची जाणीव होत होती ...
तर दुसरीकडे पाऊसाच्या आगमनाने सृष्टी प्रफुल्लित झाली होती....