सोशल मीडियाचे वेड
सोशल मीडियाचे वेड


कोणी एके काळी म्हटलेले घरातल्या गोष्टी चार भिंतीत असाव्यात
पण आज काल तश्या गोष्टी कुठे राहील्या
दिवसेंदिवस वाढत चालत आहे सोशल मीडिया वर अकाउंट
घरातल्या गोष्टी विडिओ द्वारे होतात आऊट
हे केल ते केलं सगळं काही विडिओ त
घरात फक्त बोलणं ते सुद्धा कॅमेरे त
लाईक्स कमेंट्स चा आहे फंडा
घरातल्या गोष्टी वर सुरू आहे धंदा
आज आम्ही बिर्याणी खाली असे ही सुटता सांगत
तुमचे ऐकून थोडेच आम्हाल येणार आहे ढेकर
घर चार चौघात जाहीर केलं जातं
उरल त्यात घराला घरपण देणं
एकवेळ मुठभर जेवणारी कुटुंब ही निवांत झोपत असतील
पण ह्यांना प्रसिद्धीपोटी खरंच निद्रा देवी प्रसन्न होत असेल