माझे नाव का बदलले
माझे नाव का बदलले

1 min

244
आला असेल प्रश्न सगळ्या सासुरवाशीणीच्या मनात....
का बदलले नाव माझे सासरी जातात....
आई बाबानी ठेवलेले नाव होते का वाईट
म्हणुन बदले नाव आडनावासहीत
इतक्या वर्षांची ओळख एकदम पुसून टाकली जाते
नव्या नावासह नवीन ओळख दिली जाते
नवी ओळख स्वतःलाच परकी वाटू लागते
आडनाव बदलणे ही आहे रीत आपली
कोणाचे अस्तित्व बदलणं आहे का गोष्ट चांगली
आडनाव बदलता नाव तरी तसेच राहू द्या
नव्या आयुष्यात आपलीशी एक गोष्ट असू द्या