मी गाव सोडून आलो...
मी गाव सोडून आलो...
मी आलो पण पावले तिथेच सोडून आलो,
काही वर्षापूर्वी जिथे गाव सोडून आलो,
प्रगतीच्या मोहात इतका आडकलो की,
सिमेंटच्या छतासाठी लिंबाची सावली सोडून आलो...
आधुनिकतेने घेरले असे मला की,
की म्हाताऱ्या वटवृक्षाची छाया सोडून आलो
इथे तर शेजाऱ्यांसोबत पण बोलणे होत नाही,
तिथे पूर्ण गावाचे प्रेम सोडून आलो....
सुपर मार्केटमध्ये गेल्यावर आठवलं की,
फेरीवाल्यांसोबतचा मोल भाव सोडून आलो...
ते बालपण, ते गाव, नदी किनारा, मोठा झालो,
पण जीवनाचा अनमोल ठेवा सोडून आलो
ती कातरवेळ, ते पिंपळपान, ती उंच उडी,
दंडबैठका, ती तालीम, मातीचा सुगंध,
अखाड्यातला डाव सोडून आलो...
माहित नाही कोणत्या वेळी माघारी फिरुनी
फिरून जावे लागले,
मी नदी किनारी नाव सोडून आलो...
