प्रेमाची परिभाषा
प्रेमाची परिभाषा
प्रेमाची परिभाषा मला नाही कळत
ते कळण्यासाठी प्रेम करावं लागते
दोन आत्म्यांमधील असलेल्या संवेदनाच्या भावना
हृदयाच्या न्यायालयात समजून घ्यावे लागते
मी आहे नास्तीक या जगाचा,
लोभी आहे प्रसिध्दी आणि पैशाचा
हृदयाला वेदना देऊन अश्रूच्या मार्गावर मी नाही चालत,
खरच सांगतो मित्रांनो प्रेमाची परिभाषा मला नाही कळतं
सुर्योदय घेऊन येते माझ्यासाठी नवीन लक्ष,
स्वःताचा स्वार्थ साध्य करण्यासाठी मी असतो नेहमी दक्ष
एका भेटीसाठी रातीचा दिवस होण्याच्या आतुरतेत,
मि का रहायच
एकाच चेहयासाठी आपण कशाला जगायचं
दोन जिवांना भेटण्यासाठी होसेची असते इतकी गोडी,
दीसाची रात होते तरी ती सहवासाची वेळ वाटते थोडी
एकमेकांचा आवाज ऐकण्यासाठी किती असतात पळतं
खरच सांगतो मित्रांनो प्रेमाची परिभाषा मला नाही कळतं
बालपणाची मित्र शत्रु वाटतात,
संगिनीची स्तुती जेव्हा ते करतात
नजर राहते त्या दिशेकडे जेथून ते येई,
काही क्षणाचा विरह देखील आता सहन न होई
एकमेकांकडे बघतांना डोळ्याची भाषा यांनाच कळते,
बुध्दीच्या कुविचारांना इथेच आग लागते
दमळी नसे जवळ तरीही तिच्यासाठी,
सूर्य चंद्राची माळ हे जपत
खरच सांगतो मित्रांनो प्रेमाची परिभाषा मला नाही कळतं
भावणेत असतो यांचा छंद रंगात नसतो यांना आनंद,
विचार नसे यांच्या भविष्याचा भाव नसे यांना यांच्या आराध्यांचा,
चिंता नसे येणाऱ्या पिढीची तमा नसे स्वःताच्या भविष्याची
प्रेम म्हणजे काय ? आत्मा, समर्पण, त्याग आणि बलिदान
कसले हे प्रेम ज्यात शरीरसुखाचे मांगता तुम्ही वरदान
नजरेत नजर भिडल्यावर हृदयाचे ठोके ते वाढतात,
प्रेमाच्या भ्रमात स्वःताची प्रसिध्दी देखील विकतात
तुम्ही एक आत्मा होऊनी दूसरी चिता दिसली का जळत
खरच सांगतो मित्रांनो प्रेमाची परिभाषा मला नाही कळतं
प्रेम आहे आनंद, प्रेम आहे भावणा, दुसऱ्याच्या सुखासाठी
स्वःताच त्याग हीच प्रेमाची संकल्पना
मनोराज्यातील स्वप्न तुमचे सत्यात उतरतील,
सूर्य चंद्र जमीनीवर येऊन त्यांचा आभास करतील
भावणाशून्य होऊनी प्रेम नाही समजत,
स्वार्थरूपी प्रेमाला देव सुद्धा नाही उमजत
कसली भिती जन्मदात्या बापाची,
हाच पुरस्कार त्याच्या सुखाच्या आत्मसमर्पनाची
फाटक्या साडीची नव्हंती ईच्छा ठिगळं लावलेल्या धोत्राचा काय दोष
स्वःताची चिमणी आगीत वळताना त्याचे हृदय दिसले नाही तडफडत
खरच सांगतो मित्रांनो प्रेमाची परिभाषा मला नाही कळतं
