STORYMIRROR

Pavan Pawar

Tragedy Classics Inspirational

4  

Pavan Pawar

Tragedy Classics Inspirational

!! भक्ती !!

!! भक्ती !!

1 min
307

विठ्ठला तुझे गुणगान गाऊ,

तुझ्या चरणी माथा सांग कसा ठेऊ.

तू प्रतीक सत्वचा, माझा मी अहंकार.

तुझ्या चरणी ठेवतो माझा हा अलंकार,

माझ्या या भक्तीला नाव कोणते देऊ.

तुझ्या चरणी माथा सांग कसा ठेऊ.


भक्ती तुझी निरागस मी स्वार्थी मनाचा,

भक्त तुझे निर्मोही मी कपटी या जगाचा,

तुला बघुनी माझी भक्ती कुठं देऊ,

तुझ्या चरणी माथा सांग कसा ठेऊ.


तू आहेस कल्याणकारी मानवी जीवनाचा,

विष टाकतो मी त्यांच्या संसाराचा,

माझ्या या कृतीला नाव कोणते देऊ,

तुझ्या चरणी माथा सांग कसा ठेऊ.


मी आहे परोपकारी तुझ्या सांगण्याला,

तुझी भक्ती लाभेल का माझ्या आत्म्याला.

तुझ्या कथनीवर माझी करणी कशी पाहू,

तुझ्या चरणी माथा सांग कसा ठेऊ.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy