STORYMIRROR

Pavan Pawar

Inspirational

3  

Pavan Pawar

Inspirational

!! नेतृत्व !!

!! नेतृत्व !!

1 min
217

नेतृत्व वयाने ठरत नसते,

कर्तृत्व विचाराने होत नसते.

मन जिंकावे लागते प्रजेचे,

राजा आश्वासनाने होत नसते.


घर फोडून बाहेर निघणारा विभिषण नको,

बंधू बंधालिकित वाद पेटवणारा शकुनी नको.

आयुष्य शिखरावर जाते ईच्छा शक्तीने,

मनाला वेदना देणारा वाईट प्रसंग नको.


शत्रूचे वार सहन करणारी छाती तर आहे आमच्याकडे,

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारी बुद्धी आहे आमच्याकडे.

तुमच्या कुनितीला खंभिर कृत्य ठरणार भविष्यात,

वयाच्या नावावर केलेला द्रोह विजय ठरणार भविष्यात.


योद्धा एकटा असला तरीही धाक आहे सेनेला,

रण सोडून जाणारे योध्दा नाही मिळाले या धरेला.

इतिहास चाळून घ्या भूतकालीन इतिहासाचे,

पाणी पाजले होते विकृत पुरुष रुपी मंथरेला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational