STORYMIRROR

Pavan Pawar

Romance Tragedy Fantasy

3  

Pavan Pawar

Romance Tragedy Fantasy

श्रावण

श्रावण

1 min
198

वर्षातून एक महिना येतो श्रावणाचा

घेऊन येतो वादळ पावसाचा,

शेतीच्या पिकाला संजीवनी देतो,

उत्पन्नाचा मार्ग बळीराजाच्या दारात आणतो.


महादेवाच्या आरधनेचा आचार दिसतो,

भक्ताच्या कपाळी उपवासाचा आधार भासतो.

महिलांच्या मंगळागौरीचा सात्विक भाव दिशेचा,

वर्षातून एक महिना येतो श्रावणाचा.


हलक्या रंगाची गुलाबी हवा काटा आणते मनात,

दांपत्याच्या प्रेमाला आधार दिसतो श्रावणात.

मनाला लाऊन नाही घ्यायची या दिसाची साज,

बळीराजाच्या मरणाने प्रशासनाला येते का लाज.


कुठं कमी तर कुठं उद्रेक करतो हा श्रावण,

कुठं सुख तर कुठं रडवितो हा श्रावण.

कुणाला आस लागते हिताच्या काळजाची,

कुणाच्या हृदयाला थरकाप आणतो हा श्रावण.


हिरव्या पातीला रंगाने उधळायला आला,

दारिद्र्याच्या घरात लक्ष्मीचा सारथी झाला.

बहुजनांच्या आयुष्यात रंग आणतो सूर्याचा,

वर्षातून एक महिना येतो श्रावणाचा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance