STORYMIRROR

Pavan Pawar

Others

3  

Pavan Pawar

Others

सोबती

सोबती

1 min
135

आयुष्याच्या रंगमंचात विनोद म्हणून आलो,

तुझ्या करमणुकीचा अमूल्य आधार झालो.

बोलता जरी नाही आले मला तरीही स्पर्श सांगतो,

तुझ्या जीवनाचा लपलेला आनंद द्यायला मी आलो.


नजर फिरते माझी पण तुझी कास मला,

डोक्यावर फिरलेला हाताची आहे आस मला.

न ऐकलेल्या आवाजाने गोंधळून जातो मी,

तुझ्या चेहऱ्यावर हास्य आल्याचा आनंद मला.


मी रडलो की तुझ्या संवेदना मला कळतात,

पण सांगू कसे माझे शब्द नाही वळतात,

मायेचा पदर माझ्या अंगाचे रक्षक झाले,

पाठीवरचा हात माझे भविष्य सांगतात.


मी तर एक खेळणे आहे आपल्या घरातले, 

भविष्य आहे तुमच्या उज्वल स्वपणातले.

तुमच्या शब्दावर माझे आयुष्य जगत आहे,

तुम्ही आधार आहात माझ्या आयुष्यातले.


Rate this content
Log in