Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Nilesh Chavan

Tragedy Inspirational

0.2  

Nilesh Chavan

Tragedy Inspirational

बाई

बाई

1 min
7.6K


चहा पीत पीत वर्तमानपत्रातल्या

 रोजच्याच बातम्या वाचत 

तो म्हणाला,बाईने कसं सातच्या आत घरात यावं..

ती म्हणाली,का?

तो म्हणाला,तिच्या सुरक्षेच्या दृष्टिने,आणखी काय?

ती म्हणाली,अरे व्वा! दिवसा ती सुरक्षित असते वाटतं..

कुत्सितपणे हसत तो म्हणाला,

मग काय तिला दिवसभर घरात डांबून ठेवायचं..

यावर मात्र समस्त महिलावर्गाच्या वतीने

तिने त्याचे आभार मानले

आता मात्र पुरुषी अहंकार दाखवत तो म्हणाला.

तु काही म्हण पण ,बाई शेवटी बाईच असते आणि पुरुष शेवटी पुरुष..

ती म्हणाली,हे मात्र खरं आहे....

बाई शेवटी बाईच असते,

ती पुरुष कधीच नसते..

दुर्दैव एवढंच..

पुरुषांना हे कळतं ,

पण वळत मात्र नाही.....

त्याचा चहाचा कप उचलत 

इतके बोलून ती तिथून निघून गेली..

त्याच्यासाठी गरम गरम नाश्ता बनवण्यासाठी


Rate this content
Log in

More marathi poem from Nilesh Chavan