STORYMIRROR

Vaishnavi Kulkarni

Tragedy

3  

Vaishnavi Kulkarni

Tragedy

व्यथा रामरायाची

व्यथा रामरायाची

2 mins
215

एक नवल सांगू मंडळी , मला आज चक्क श्रीराम भेटले

जन्मोत्सवाच्या आनंदाने तृप्त तरीही थोडे उदास वाटले ||ध्रु||


अत्यानंदाने मी गेले सुखावून अन् केला चरण स्पर्श ,

साक्षात रामचंद्रांनी दर्शन दिले मला म्हणून झाला परमहर्ष ||१||


मी म्हटले प्रभू , तुमचा जन्मोत्सव तर खूप जल्लोषात साजरा झाला |

प्रत्येक भक्त तुमच्या राजस दर्शनाने पतीताचा पावन झाला ||२||


मग तुमच्या चेहऱ्यावर आज ही खिन्नतेची सावली का ?

काल प्रसन्नतेने पाझरणारी तुमची चर्या आज काळवंडली का ? ||३||


तसे प्रभू उद्गारले , काय सांगू तुला आता माझी रामकहाणी |

मनी विचार येताच नकळतच माझ्या नेत्री येते गं पाणी ||४||


मी म्हटले रामा तुमच्या भक्ताजवळ करता का तुमचे मन मोकळे ?

वदले राघव , केवळ एक दिवसच का चालती माझ्या प्रागट्याचे सोहळे ? ||५||


इतर वेळी मी उभा असे सवे घेऊनी केवळ सीता अन् लक्ष्मण |

मग त्या वेळी का ग द्रवेना आमच्या भेटीसाठी तुम्हा भक्तांचे मन ? ||६||


का केवळ माझ्या जन्मदिनीच तुम्ही सारे आम्हाला भेटायला , पाहायला येता ?

अन् इतर वेळेस मात्र आमच्याकडे पाठ फिरवूनी निघून जाता ? ||७||


नाही आस मजला उंची पोशाख अन् पंचपक्वांनांची , मी केवळ तुमच्या साऱ्यांच्या प्रेमाचा भुकेला |

एरवी का ग कोणी देत नाही ' ओ ' माझ्या प्रेमळ हाकेला ? ||८||


तुमची हंगामी भक्ती देखील करतो मी स्वीकार कारण तुम्ही सारी माझीच लेकरे |

परंतु अशा एकाकी पडलेल्या मला पाहून माझ्या सीतेचे मन विवंचना पोखरे ||९||


ती ही मग विचारी मला की स्वामी , का आपलीच लेकरं आपल्याशी अशी वागतात |

केवळ एकच दिवस दर्शनासाठी येतात अन् मग वर्षभर आपल्यासाठी अनोळखी म्हणून जगतात ?||१०||


सांग ना मग बेटा , मी सीतेला काय देऊ अशावेळी उत्तर ,

केवळ राम नवमी आली म्हणून एकच दिवस का शिंपडतात माझ्या नावाचे अत्तर ? ||११||


ऐकुनी त्या विधात्याची व्यथा , मी ही मंडळी मग निशब्द झाले |

त्या भगवंताचा भक्त स्वार्थी झाला की ढोंगी म्हणून विचारधारेत बुडाले ||१२||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy