STORYMIRROR

kishor zote

Inspirational Tragedy

3  

kishor zote

Inspirational Tragedy

गाडगेबाबांचा देश

गाडगेबाबांचा देश

1 min
15K


गाडगेबाबा तुमचे विचार

आणि तशी तुमची कृती

दिवसा गाव रात्री डोके

घाण सारी साफ करती

तुमचे असे प्रबोधन

राहीले आता दूर

स्वच्छता अभियान

निघतो फक्त सूर

गांधींचा तो चष्मा

विसंगती दावतो

स्वच्छ व भारत

वेगळा तो दावतो

जेथे स्वच्छ तेथे

नाही भारत दिसत 

जेथे भारत तेथे

नाही स्वच्छता वसत

गाव, शहर, सर्वत्र

होते सफाई चर्चा

प्रत्येक व्यक्ती मग

करतोय आता खर्चा

सफाई हवी आता

दुमत कोणा नाही

मनही जुळावीत

तसे घडत का नाही?

मनातील जातीवाद

भेदभाव दूर व्हावा

गाडगेबाबांचा देश

जगी मग चमकावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational