हाल शिक्षणाचे ( कविता )
हाल शिक्षणाचे ( कविता )
वेळ पाहाटेची
केलीया तयारी
शाळेचे कपडे
घाली अंगावरी...१
किती आनंदाने
निघालो शाळेला
तुफान पाऊस
कालच झालेला....२
शाळा दूरवर
वाहन ही नाही
दप्तर पाठीला
खंत कधी नाही...३
सोबती सगळे
संगती चाललो
पाय चिखलात
जिद्द ना हारलो....४
रुते चिखलात
चाक प्रगतीचे
पहा स्वातंत्र्यात
हाल शिक्षणाचे...५
