साबरमतीच्या संता
साबरमतीच्या संता
साबरमतीच्या पूज्य संता
तुज पूजते जरी जनता
नाव तुमचे घेवून बापू
राज्य करतोय गब्बर नेता..!!
तत्व तुमची सर्व महान
परी नेत्यांनी ती केली लहान
जयंतीपुरतीच अहिंसा
हिंसेविना ना हलते पान..!!
जपतोय आता जो तो बापू
कृपया गैरसमज नसावा
नोटांवरचा तुमचा फ़ोटो
तिजोरीतच नित्य वसावा..!!
हेही तितकेच खरे बापू
इथे तुम्हास आहे प्रथम मान
खिशात ठेऊन जो तो म्हणतो
मेरा भारत महान, मेरा भारत महान..!!
