उंबरठा
उंबरठा
सुटला श्वास देहामधला
प्राण काही सुटेना
उंबरठा तरी मजला पुजू दे
थांब देवा थांब रे
आयुष्याच्या नात्यांचं
हे ऋण आहे मजवरी
लेणी मला लेवू दे
उंबरठा तरी मजला पुजू दे
थांब देवा थांब रे
ममतेच्या डोहामध्ये
बुडले माझे काळीज रे
बोलवतो रे बाळ माझा
उंबरठा तरी मजला पुजू दे
थांब देवा थांब रे
कुंकू कपाळी लावते रे
धन्यास माझ्या पाहते
चरणस्पर्शाने पवित्रु दे
उंबरठा तरी मजला पुजू दे
थांब देवा थांब रे
संसार माझा अर्धा रे
घर माझे एकाकी रे
डोळे भरून शेवटचे पाहू दे
उंबरठा तरी मजला पुजू दे
थांब देवा थांब रे
