प्रेम बंध
प्रेम बंध
मी शिंपली हृदयफुले प्रेम वाटेवर
प्रेम तुझे सख्या रे हळुवार फुलणारे
बाहुत तुझ्या मी मलाच पाहते
हे दृश्य आज आहे भलतेच लाजणारे
केसात माळले नाजुक मोगऱ्यास
हे बंध रेशमाचे हलकेच खोलणारे
कशास कुरवाळी केशास साजणा रे
लाजून थोडे झाले मन हे लाजणारे

