वाट पाहतो
वाट पाहतो
प्राजक्त फुललेला गंधाळली पहाट
देण्यास दर्श जगता रवीराज वाट पाहतो
सांज अंधारली ही दरवळे रातराणी
उमटण्यास आभाळी हा चंद्र वाट पाहतो
खळखळते सरिता वाट काढत किनारी
मिलनास तिच्या हा सागर वाट पाहतो
बिज हे पेरलेले धरती ऊब देते
घेण्यास जन्म अंकुर वाट पाहतो
बेधुंद पहाटे धुक्याची चादर ही पसरली
त्यातून बाहेर येण्यास दिवस वाट पाहतो
आभाळ काळोखले दामिनी चमकल्या
बरसण्यास पाण्यास चातक वाट पाहतो
श्रृंगार भारलेला नजरेत प्रेम वसते
मीलनास दोघांच्या मधुचंद्र वाट पाहतो

