लालसा
लालसा
खाली हिरवेगार बाहुपाश
वर निळे निळे आकाश
घनघोर असा काळोख
वाऱ्याचा आवाज जरा ओळख
मोहक चांदण्यांचा प्रकाश
जणू चंद्राचा तो श्वास
अशा या एकाकी रजनी
प्रिय आहे ध्यानीमनी
सख्याचा स्पर्श वाटे
जणू प्रेमाचा हर्ष
त्याची खट्याळ नजर
करी हृदयात कायमचे घर

