STORYMIRROR

Swati Gaidhani

Romance Others

4  

Swati Gaidhani

Romance Others

प्रेम छटा

प्रेम छटा

1 min
405

चंद्र आहे सोबत आपल्या

शितल त्याचा प्रकाश 

काही सांगायचे आहे तुजला

आठवण प्रेमाची अशी खास 


लुकलुकत्या चांदण्यांच्या

 छता खाली बैसलो दोघे 

मोजत होतो स्वप्ने आपले 

हाती हात तुझा पूर्ण रात्र जागे 


दरवळत आहे रात राणी

अंतरमुग्ध तिचा गंध 

थंड झुळूक थरथरती अधरे

सोबत आपण हरपले बंध 


प्रेम छटा मग उमटली मनी

प्रतिमा दोघांच्या या डोळा

आतुर ह्रदयी वसते प्रीती 

हसरी छटा मग दिसते गाली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance