STORYMIRROR

rohini khot

Romance

4  

rohini khot

Romance

@अजूनही बरसात आहे@

@अजूनही बरसात आहे@

1 min
592

रिक्‍त होते जीवन माझे

 तुझ्यासवे अर्थ जगण्याचा नव्याने खुलला आहे 

थेंब ओघळे प्रेमाचा अलवार 

सवे अजूनही बरसात आहे 


चाफा मोहरे अंगणी 

पारिजातकाचा गंधही तनामनात दाटला आहे 

पावलांसोबत तुझ्या चालता 

त्या वाटेवर अजूनही बरसात आहे


तुझ्या नुपूरांच्या आवाजाने

 मन्मनी आनंद वाहे 

कंकणांची किणकीण वेडावे जीवा 

वाटे अजूनही बरसात आहे 


आजही दारावरी सांज

 रोज नव्याने ओथंबते आहे 

सुखाच्या सरींची सये इथे 

अजूनही बरसात आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance