STORYMIRROR

Ravindra Sonawane

Romance

4  

Ravindra Sonawane

Romance

*प्रेम रंग*

*प्रेम रंग*

1 min
667


जागेपणी प्रिये तू, डोळ्यापुढे असावी 

मिटताच लोचने मी, स्वप्नातही दिसावी.             || धृ ||


 झुकवून नेत्र खाली, रोखून ते पहाणे, 

जणू पाहिलेच नाही, असले तुझे बहाणे, 

 पदरास पीळ भरता, नेहमीच तु दिसावी   ||१||


 तू रेखीता कपोली, ती चंद्रकोर लाल, 

मुखचंद्र लाजुनी ग, होईल लाली लाल, 

जास्वंदी सम लाली, गाली सदा दिसावी ||२||


आषाढ मोकळा तू, झटकू नकोस वेडे, 

हरवून भान जाते, वेल्हाळ प्रेम वेढे

गजऱ्यांस माळताना, खिडकीत तू दिसावी ||३||


जा तू खूशाल आता, झुकवून नेत्र खाली, 

काळीज फेकले मी, वाटेत भोवताली, 

 तुडवीत काळजाला, जाता सदा दिसावी ||४||


ते दक्ष लक्ष जेव्हा, डोळ्यात रंगते ना! 

पाहू नको, कि पाहू? माझे मला कळेना, 

प्रीती तुझी न माझी, अद्वैत आज व्हावी ||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance