*शीर्षक - भारत देश महान*
*शीर्षक - भारत देश महान*
जगताच्या पाठीवर वसतो एक अलौकिक देश
अनेक भाषा, धर्म जोजवी आमुचा भारत देश ||धृ.||
इथे नांदती भाषा-भगिनी, गळ्यात घालून गळा
सह्याद्रीला नित्य लागतो हिमालयाचा लळा
मानवतेची गगन दुंदुभी, देत हाच संदेश ||१||
राम राम, अल्ला हो अकबर, सुरात एका घुमे
इसा, मसिहा, नानक, नामे श्वासांतुन गुणगुणे
धर्म भिन्न, परि एक रक्म, हा अंतरीचा आदेश ||२||
हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, स्मरती भाईचारा
गंगाजल ते एकच, जैसा एक वाहतो वारा
कोटी शरीरे, एकच आत्मा, अनंत हा प्राणेश ||३||
ईद मुबारक, ध्वनी उमटती, इथे मंदिरातुनी
साल मुबारक, प्रतिध्वनी ते, घुमे मशिदितुनी
एकच धरती, एकच अंबर, एकच पुण्य प्रदेश ||४||
सर्व धर्म, समभाव नांदती, असे निरंतर येथे
लक्ष मनांचे संगम पावन, दर्शन घडवी इथे
पुण्यशील अन् पवित्र ऐसा एकच भारत देश ||५||