STORYMIRROR

Ravindra Sonawane

Others

4  

Ravindra Sonawane

Others

*आली दिवाळी आली*

*आली दिवाळी आली*

1 min
232

पहा थांबल्या अमृतधारा 

शांत जाहला वादळवारा

गजबजला ओसाड किनारा

घराघरातून आता उजळतील लक्षदीप माला 

आला दिवाळीचा सण आला


गच्च पिकातून मोती भरले 

आनंदाचे क्षण मोहरले

शरदाचे नवरूप बहरले 

पहाट वारा चैतन्याची शीळ घुमवू लागला 

आला दिवाळीचा सण आला


शाळांनाही सुट्ट्या लागल्या

मौज मस्तीच्या लाटा उठल्या

सुगंधी स्नाने अंगत पंगत रंगत चढे फराळाला 

आला दिवाळीचा सण आला


अंधाराची सोडून सोबत 

करू प्रकाशाचे सुस्वागत 

कुणी न राही दुःखित वंचित

जनसेवेचे व्रत आचरती वंदू तयाना चला 

आला दिवाळीचा सण आला


Rate this content
Log in