STORYMIRROR

Sonali Kose

Romance

4  

Sonali Kose

Romance

स्पर्श तुझा

स्पर्श तुझा

1 min
593

हवाहवासा स्पर्श तुझा

मनात प्रीत फुलविण्या

देहभान विसरूनी सारे

वेड या हृदयास लागण्या


        पुसटश्या स्पर्शाने तुझ्या

        जणू वेड जीवा लागते

        बेधुंद मनाच्या लहरीत

         प्रीत तुझी ही फुलते


घेऊनी असं घट्ट मिठीत

काळीज माझं धडधडतं

छेडूनी हृदयाच्या तारा

जीव ही कासावीस होतं


       पहिला स्पर्श तुझा असा

      माझ्या नयनांशी भिडावा

     बघताच डोकावूनी डोळ्यांत

      तुझ्या प्रीतीने बेधुंद व्हावा


नकळत कसं इतकं प्रेम

तुझ्यावर निःशब्द करावे

हृदयाच्या कानाकोपऱ्यात

श्वास हे श्वासात अडकावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance