STORYMIRROR

Sonali Kose

Others

4  

Sonali Kose

Others

सरणावरची चिता बोलून गेली

सरणावरची चिता बोलून गेली

1 min
407

आप्तजन ते सारे माझेच होते...

खोट्या मुखवट्यात आपुलकीची नाती जपत होते


जिवंतपणी ना मिळाली कुणाची साथ

मरणानंतर माझ्या आले साऱ्यांचे जवळीक हात


तिळतिळ तुटुन काळीज हा माझा फाटत होता

विचारणा करण्या माझी आधार कुणाचाच नव्हता


मनाला लागलेली अहंकाराची किळ ते जपत होते

आतल्या आत श्वास मात्र माझे जात होते 


जिवंत माझ्या शरीराची नव्हती तेव्हा किंमत

मरणानंतर वाहवाई करण्यास सारेच मात्र सहमत


मी रडताना ना कुणी सांत्वना द्यावयास आले होते

कायमची निद्रावस्थेत मला पाहून हंबरडा सारे फोडत होते


हयातीत माझ्या जे अबोला धरून बसले होते

नावानुरुप नातीगोती जपण्या आज तेही आले होते


भूतकाळ आठवून आठवून पश्र्चाताप ते करीत होते

मला पेटविण्याच्या तयारीत सारेच लागले होते 


गरज मला भासताना धावून कुणीच ना आले

सरणावर माझे प्रेत नेण्या चार खांदे मात्र समोर आले


जिवंतपणी आपल्यांनीच होते मला छळले 

शेवटची अंघोळ घालून दुःखात सारे न्हाले 


चिता माझी होती कायमची झोपलेली

आपल्याच माणसांनी माझ्यासाठी होती सरण रचलेली 


त्या ज्वलंत तप्त निखाऱ्यावर शरीर माझा राख बनत होता

मेल्यावरही एकटे सोडून आप्तजन माझा परतत होता


हे दृश्य पाहता सरणावरची चिता बोलून गेली

मरणाने तुझ्या चितेची यातनेतून मुक्तता झाली



Rate this content
Log in