Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sonali Kose

Inspirational Others

3  

Sonali Kose

Inspirational Others

अरुणोदय

अरुणोदय

1 min
152


दाही दिशा काळीकुट्ट

तरी प्रकाश हा पसरेना

अंधक बनुनी जगतोय माझा समाज

विश्वास मज आता होईना


शिक्षित असूनी बनतोय लाचार

बुवाबाजी , फुंकरवर ठेवतोय विश्वास

अरे , मतदानालाही विकला जातो

बंदिस्त होतेय जगण्याचे श्वास


संपत्ती , ऐश्वर्य नी त्याही पलीकडे

हवा आहे मोठा बंगला

डोळ्यांतच दडून ठेवतोय ही स्वप्ने....गरिबीमुळे

आपणही जगावे असे एशो आरामात चांगला


खांद्याला खांदा नाही

हातात हात मदतीचा नाही

लोभ , मोह , माया , मत्सर

चांगले गुण अजूनही त्याच्या अंगी नाही


व्यसने करतोय विविध तऱ्हेचे

इकडे खायला नाही पोटात अन्न

मोठमोठी नेते देती आश्वासने

गरिबांचं जगणं करतोय सुन्न


कधी होईल हे मानवी जीवन

अंध:कारातून लवकर मुक्त

जीवन प्रकाशमान होण्यासाठी

बघावी लागेल वाट आता

अरुणोदयाची फक्त....अरुणोदयाची फक्त



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational