STORYMIRROR

Sonali Kose

Inspirational Others

3  

Sonali Kose

Inspirational Others

घेऊ कसा श्र्वास स्वातंत्र्याचा

घेऊ कसा श्र्वास स्वातंत्र्याचा

1 min
156

मुलगी म्हणुनी आलोया जन्मास

काय हा माझा गुन्हा असावा

कसला स्वातंत्र्य म्हणताय तुम्ही

जिथे कधीच मुलीला मान नसावा


स्वतंत्र म्हणता म्हणता

वाढतोय किती हिंसाचार 

महिला नाही आजही सुरक्षित

धाक, थरारा नी शोषणाचा मार


भर रस्त्यात , चौकात 

स्त्रीची अब्रू वेशीवर टांगताय

होतेय खून चक्क डोळ्यांसमोर

तरीसुद्धा मदतीला कुणीच नसताय


कसला म्हणावं हा स्वातंत्र्य तरी

रोज शोषणाची न्यूज कानी पडते

तरी फिरतो नराधम खुल्ले आम

नी रोजच कुणाची आया बहीण बळी पडते


थांबवा आता तरी हा अत्याचार

फिरुद्या मनसोक्त तरी स्त्रियांना 

कोंडल्यासवे जीव जाईल तिचा

शिक्षा हवी असल्या नराधमांना 


कित्येक भोगते ती ९ महिने यातना

तेव्हा कुठं तुम्ही जन्माला येता

आणि त्याच स्त्रीला मान सन्मान न देता

वाईट कृत्याने तिचा जीव घेता 


सांगा मग आता तरी 

स्वातंत्र्य आहे तरी कुणाला ?

मणिपूरची घटना ऐकूनही

समज येईनासी तुम्हाला


आपल्याच आसपास फिरतोय नराधम

सांगा मग घेऊ कसा श्वास स्वातंत्र्याचा

कोंडमाऱ्यात जगुनी चालणार नाही आता

रूप दाखवावेच लागेल स्त्रित्वाचा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational