STORYMIRROR

Sonali Kose

Inspirational Others

3  

Sonali Kose

Inspirational Others

एकांत

एकांत

1 min
118

विविध तऱ्हेचे विचार 

भेडसावती या मनाला

निघून गेलास सख्या रे

घायाळ करूनी जीवाला 


तुझ्या खोट्या प्रेमाला

माझं खरं प्रेम हरलाय

रात्रंदिवस एक करून

डोळे सतत पाणावलेय 


मनाच्या या गाभाऱ्यात

जखम ही खोलवर

आठवणींच्या हिंदोळ्यात

तुलाच आठवते जीवनभर


सुवासिक तो गुलाब

काटे त्यात रचलेले 

कळला ना हा तुझा डाव मला

कारण होते वेड तुझेच लागलेले


किती कठीण झालंय जगणं 

आता अंधारलेल्या जीवनात

एकांताने विस्कटली मानसिकता 

वेडी होऊनी तुझ्या प्रेमात 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational