सहवास तुझा हवासा
सहवास तुझा हवासा
नाजूक चंचलशा या मनाला
दिशा दाखविण्या ती नवी
दुथळीभर वाहून चालणारी
तुझी निर्मळ अशी प्रीत हवी
त्या चंद्र , ताऱ्यांची कधी
आशाच नाही मजला तरी
माझे सारे सुख तुझ्या कवेत
सामावून घेतले आजन्मावरी
तुझ्या स्पर्शाला न्याहाळता
मन हे बेभान होऊन जाते
वेडी ही प्रीत अधिकाधिकच
सैरभैर होऊनी अशी बहरते
तुझ्यातील साधेभोळे वर्तन
तार छेडिते अधिकच मनाचे
काळजीने होई भाव व्यक्त
यातच कळते बोल प्रेमाचे
भेटण्याची ती रोजची वाट
पाऊलखुणाही त्याच दिशेने
सैरभैर भावना होई अनावर
तुझ्या हव्याहव्याशा सहवासाने
कु. सोनाली नामदेव कोसे - नागभिड

