दिखावा
दिखावा
1 min
173
कुणास म्हणावे वाईट
कुणास म्हणावे चांगलं
खोट्यानाट्या ह्या दुनियेत
कोण करेल कुणाचं भलं
अनेक रंगात भाळला जातो
आपलाच विश्वासू मनुष्य
मुखवट्यात अनेक दडलेले
असतात त्याचे स्वार्थी दृश्य
लोभाचा मायाजाल
स्वार्थी त्याची वृत्ती
चांगुलपणाचे सोंग उरी
वाढतेय फसवणुकीची कृती
जीवन असते एक रंगमंच
मुखवटे त्यात बदलावेच लागते
पोटापाण्यासाठी स्वतःच्या
रंगमंचावर सादर करावे लागते
राग, द्वेष, लोभ, मत्सर
वरून सरड्याची चाल
दिखावा माणसामाणसांत
वाढतच चाललंय आजकाल
