STORYMIRROR

Sonali Kose

Inspirational Others

3  

Sonali Kose

Inspirational Others

प्रेमाचा रंग

प्रेमाचा रंग

1 min
161

तन मन भिजावे माझे

रिमझिमणाऱ्या पावसात

चिंबचिंब सरिंत न्हाहून

मन गुंतले कसे तुझ्यात


उधाण माझ्या भावभावनांना

यौवनात हरवले भान माझे

चढली नशा बेधुंद प्रितीची 

सर्वत्र लागले कसे वेड तुझे 


चाहूल लागताच तुझ्या छायेची

सर्वत्र होई मज तुझाच भास

नयन येई भरुनी त्या क्षणास

जवळीक तू माझ्या असण्याची आस


सदोदित असावी साथ तुझी 

रंग प्रेमाचा तुजवरती शिंपडीते

त्या प्रेमरंगात रंगून रंगबिरंगी

अधिकच मन माझे मोहिते


माळूनी केसांत सुवासिक

तुझ्या प्रेमाचा सोज्वळ गजरा

उतावीळ या जीवाला करतोय

घायाळ तुझा मनमोहक चेहरा


दृष्ट न लागो कधी कुणाची 

तुझ्या माझ्यातल्या घट्ट नात्याला

प्रेमरंगात होऊनी मस्त मगन

बहर येई तुझ्या माझ्या प्रेमाला



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational