STORYMIRROR

Sonali Kose

Others

4  

Sonali Kose

Others

आभास हा

आभास हा

1 min
12


का होतो ? कसा होतो ?

आभास तुझा मज क्षणोक्षणी 

लागे या जीवा कसली हुरुहुर

तुझीच आठवण नित्य मनी 


कधी दूर तू असतानाही 

जवळीक माझ्या जाणवतो 

या हृदयाची कहाणी तुला 

माझ्या शब्दांतूनी तुज सांगतो 


कसा वेडावला जीव हा 

गुंतला तुझ्याच आठवणीत 

प्रीत माझी बरसावी अशी 

न कळता तुलाही अवचित 


हर्ष होई मनास माझ्या

जेव्हा दिसता तू समोर

कदाचित तुझ्या प्रेमाची गोळी

अंगी माझ्या भरली घनघोर 


तुझा सहवास , तुझाच स्पर्श 

होई तुझ्या असण्याचा आभास 

प्रीत फुलोऱ्यात ओथंबून स्वतःला

मनी विचित्र असा तुझाच ध्यास 



कु. सोनाली नामदेव कोसे - नागभिड


Rate this content
Log in