STORYMIRROR

Sonali Kose

Inspirational

3  

Sonali Kose

Inspirational

जिद्द

जिद्द

1 min
125

लोकं आपल्याला नावे ठेवतात

म्हणून त्यांचाच विचार करायचं नसते

वाटेत असले जरी भयाण काटे 

वाटेतील पाऊलवाट थांबता चालायची असते


मला हे कधी जमणारच नाही

मनोमनी असाच प्रश्न उद्भवायचं नाही

*" मी करू शकते "* या मंत्राने

एक एक पाऊल पुढे चालत जाई 


स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यास

खरंतर स्वावलंबी असावं लागते 

धीर न सोडता कधीही

अपयशालाही अनुभवायचे असते


एकदा हरलो , दुसऱ्यांदा हरलो

तिसऱ्यांदा जिंकण्याला का हरायचं 

पंखात नसलं बळ जरी

स्फूर्तीने उडण्याचे धाडस दाखवायचं 


एकावेळेस घास खाण्याऐवजी

हळूहळू ते अन्न पचवायचे असते

पचता-पचता पचेलच एके दिवशी

मोठे शिखर गाठण्याची तयारीही असावी लागते


*" प्रयत्नांती परमेश्वर "* या युक्तीला

ध्यानीमनी अपुल्या बसवायचे 

आत्मविश्वास न डगमगता कुठेही

डोळ्यांत तेल घालून स्वप्न साकारायचे 


प्रकाशमान दिवस नी अंधारलेली निशा

मुठीत एकवटून *जिद्द* कधी सोडायची नाही

जखडलेल्या गुंतागुंतीच्या जाळ्यात

ध्येयवेडा बनुनी जगणं का सोडायचं अपयशापाई 


एकदाच्या डोळ्यांत सामावलेल्या स्वप्नांना

अर्धवट असं सोडायचं नसते

स्वतःची स्वतःशीच तुलना करत

कठीण संघर्षाने हे जीवन जगायचे असते 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational