STORYMIRROR

Sonali Kose

Inspirational Others

3  

Sonali Kose

Inspirational Others

जपू राष्ट्राची एकात्मता

जपू राष्ट्राची एकात्मता

1 min
110

एकजुटीच्या बंधात राहू

मनी धरुया एकची कास 

भेदाभेद नाहीसा करून

सर्वधर्मसमभाव एकच ध्यास


मोठ्या व्यक्तींचे आदर्श

जपुया सद्सद विचारातून

लेखणीतून बा भीमाच्या 

साकारलेल्या संविधानातून


लोकशाही , गणराज्य

स्वतंत्र अपुला भारत देश 

सळसळत्या रक्तातून 

घालू माणुसकीचा भेस


आया , बहिणींना

देऊ इथे मान सन्मान

उगीच नको बोलण्यापुरतं 

वाढविण्या देशाची शान


निधळ्या छातीचे आम्ही

कणखर भारतवासी

वीरमरण पत्करले ज्यांनी

लावुनी गळा फासी 


एकजुटीने सहकार्य करू

जपू राष्ट्राची एकात्मता 

गल्लोगल्ली पसरलेल्या

करू नष्ट विषमता 


थोर विचारवंतांचे कार्य 

करू आपण आत्मसात 

लढूया आपल्या राष्ट्रासाठी 

देऊनी माणुसकीचा हातात हात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational