STORYMIRROR

Sunil Khaladkar

Romance

4  

Sunil Khaladkar

Romance

सुगंध प्रीतीचा

सुगंध प्रीतीचा

1 min
647

किती वाट पाहिली ग आज,

सूर्य ही आता मावळला...

चांदणी चे रूप पाहुनी,

चंद्र ही आज पाघळला.....


समुद्रावरील लाटा ,

तुझ्या आठवांनी ग भिजल्या ....

अलगद येऊनी वाळूवर,

कुशीत छान निजल्या .....


तेवढ्यात अचानक वाऱ्याची,

एक सुगंधित झूळूक आली...

तुला येताना पाहून सखे,

ती शब्द सुमनात न्हाली...


हात तुझा हाती घेता,

केलेस अलगद डोळे बंद....

श्वास तुझा ,माझ्या श्वासात येता,

पसरला प्रितिचा सुगंध....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance